पुणे : फटाके वाजवण्याच्या वादातून दुकानदाराच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी ( दि. ४) रात्री टिंगरेनगर रोडवर घडली.
शिवाजी पाटील (रा़ टिंगरेनगर) हे प्रकारात गंभीर जखमी झाले आहेत़. निहाल सुनिल सरोदे (वय २६), विनोद राजू जमखंडे ऊर्फ गोट्या (वय २२), अमोल तात्या चव्हाण (वय २४, सर्व रा. श्रमिक वसाहत, टिंगरेनगर) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
साळवे याने रस्त्यावर फटाके लावून तो पायाने शिवाजी पाटील यांच्याकडे ढकलला. तो पाटील यांच्या पायाजवळ फुटला. त्यामुळे पाटील त्यांना ओरडले. त्यामुळे या चौघांनी त्यांना बेदम मारहाण केली. विश्रांतवाडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.