पुणे : वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ उद्या (शनिवारी दि. 1) एक दिवस शहरातील सीएनजी टोरेंट पंप बंद राहणार आहेत. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहन मालकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
शहरातील सुमारे 60 पेक्षा अधिक सीएनजी पंप बंद राहणार आहेत. शहरातील काही पंप बंद राहणार असले, तरी शहरातील ज्या सीएनजी पंपांना एमएनजीएलकडून गॅस पुरवठा केला जातो. ते पंप सुरू असणार आहेत.
तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर या बंदचा कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी सांगितले.
विक्रेत्यांना त्यांच्या ट्रेंड मार्जिनमधील पुनरावृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. टोरेंट गॅसकडून हक्क आणि वाजवी मार्जिन या मागणीसाठी पेट्रोल डीलर असोसिएशनने हा बंद पुकारला आहे.