PUNE : मनोरुग्णाची 35 फुटी जाहिरात फलकावरुन उडी; अग्निशमन दलाने वाचवण्याचे प्रयत्न केले पण…

पुणे – पुणे रेल्वे व बस स्थानकादरम्यान असलेल्या 35 फुटी जाहिरात फलकावरुन एका मनोरुग्णाने उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. अग्निशमन दलाने त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांच्या हाती न लागता त्याने खाली उडी मारली.

पुणे स्टेशन परिसरात दुपारी दिडच्या सुमारास एक वेडसर व्यक्ती जाहिरातीच्या बोर्डवर चढली होती. हा बोर्ड 35 फुट उंच आहे. ही व्यक्ती तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला याची खबर दिली.

कसबा फायर स्टेशनचे कर्मचारी तेथे तातडीने दाखल झाले. त्यांनी तसेच काही नागरिकांनी साईन बोर्डवर चढून त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. तसेच खाली जाळीही धरुण ठेवण्यात आली होती. मात्र त्याने जवानांची चकवा देत थेट रस्त्यावर उडी मारली.

यामध्ये त्याला गंभीर मुका मार लागला आहे. त्याला ससून रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधीत व्यक्तीसंदर्भात माहिती घेत असल्याचे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्‍विनी सातव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.