कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा बोरपाडळे रोडवर अज्ञात चारचाकी वाहनाने पेट घेवून त्यामध्ये वाहन चालक अभिजित पांडूरंग ठाणेकर (रा. आजरा) हे जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
रत्नागिरी रोडवर बोरपाडळे घाटात एका चार चाकी वाहनाला शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत चारचाकी गाडीसह कारचालक अभिजित ठाणेकर जळून खाक झाला आहे. ही आग स्थानिकांसह अग्निशामक विभागाने विझवली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या चारचाकी वाहनाची माहिती मिळवण्याचे काम पोलीसांकडून सुरू आहे.