शर्जील राष्ट्रद्रोही असेल तर, सिद्ध करा- कन्हैया कुमार

पाटणा : नागरिकत्व कायद्याविरुद्ध शाहीन बाग येथे केलेल्या भडकाऊ भाषणप्रकरणी जेएनयू विद्यार्थी शर्जील विरुद्ध राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर जेएनयूचे माजी विद्यार्थी कन्हैया कुमार यांनी मत व्यक्त केले आहे. शर्जील विरुद्ध राष्ट्रदोहाचा गुन्हा लावणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.

शाहीन बागेत शर्जील इमाम यांनी दिलेल्या भाषणाला आमचा पाठिंबा नसल्याचे म्हंटले आहे. शर्जील आमच्या विरुद्धही बोलतात. शर्जील राष्ट्रद्रोही असेल तर सिद्ध करा. देशात चुकीच्या पद्धतीने राष्ट्रद्रोहाचा जाणीवपूर्वक वापर होत असल्याचे कन्हैया कुमार म्हणाले. माझ्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता असेही ते म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.