हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील एकाच कुटुंबातील तीन बहिणी शासकीय नौकरीत रुजू झाल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकरी कुटुंबातील धोत्रे यांच्या तीनही मुली शासकीय सेवेत काम करत आहेत. सपना धोत्रे हिची गेल्या सहा महिन्या पुर्वी स्टाफ नर्स पदी जॉईनीग झाली.सध्या ती हिंगोली येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये काम करत आहे तर कविता धोत्रे दोन वर्षापुर्वी आरोग्य सहाय्यक पदी नियुक्ती झाली आहे. आता त्या उदगीर तालुक्यातील हेर येथील शासकीय रुग्णालयात काम करत आहेत. तर तिसरी मुलगी सेनगाव तालुक्यातील कौठा येथे पोलिस पाटील म्हणून कार्यरत आहे.
एकाच कुटुंबातील तीनही बहिणी आज शासकीय सेवेत काम करत आहेत. वडिलाची हालाकीची परिस्थिती असतांना देखिल वडिलांनी राबराब कष्ट करून आपल्या मुलीना शिकवले धोत्रे कुटुंबाकडे जास्त जमीन नसल्याने त्यांनी गुरे डोरे सांभाळून मुलीना शिकवले. धोत्रे यांना एक मुलगा आहे पण तोही दिव्यांग आहे त्यामुळे त्यांनी काबाड कष्ट करून मुलींना शिकवले आणि आज तीनही मुली शासकीय सेवेत रुजू आहेत.
सपना धोत्रे आणि कविता धोत्रे यांचे प्राथमिक शिक्षन गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षक हिंगोली येथील आदर्श कॉलेज येथे घेण्यात आले गावातील एका गरीब कुटुंबातील या मुली शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल गावकऱ्याकडून त्याचा गावात सत्कार करण्यात आला. तीनही बहिणींना सर्व मार्गदर्शन खुडे साहेब यांनी केले. गावातील इतर मुलींसाठी या मुलींचा प्रवास एक प्रेरणा बनला आहे.