हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शाळेतील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी हिवरखेडा येथील जिल्हा परिषदेत शाळेतील विध्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागें घेणार नाही अशी भूमिका यावेळी पालकांनी घेतली होती.
हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शाळा आहे आणि या शाळेत 106 विध्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शाळेत वर्ग आठ असले तरी शिक्षक मात्र दोनच आहेत. त्यामुळे आज विध्यार्थी यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन केले.
या शाळेला शिक्षक देण्यासाठी वेळोवेळी शिक्षण विभागाला निवेदन दिले होते मात्र शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. या शाळेत आधी चार शिक्षक होते मात्र आता ही संख्या दोन शिक्षकांवर आली आहे. त्यामुळे पालकांनी मुलासह हिंगोली येथे जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती.
लेखी आश्वासनंतर आंदोलन मागें
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देत बदली झालेल्या शिक्षकांना पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. याविषयीचे लेखी आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आल. त्यानंतर पालकांचे आंदोलन मागे घेतले गेले.
आमच्या हिवरखेडा गावात आठवीपर्यंत शाळा आहे मात्र सध्या या शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यात एक शिक्षक मराठा सर्वेक्षण करत आहे आणि आठ वर्ग एक शिक्षक सांभाळत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे आमच्या शाळेत तीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्याठिकाणी आम्हाला कायम स्वरूपी शिक्षक देण्यात यावे. आता आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत सध्या आम्हाला तात्पुरते शिक्षक देण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत पण आमच्या शाळेला परमनंट शिक्षक देण्यात यावे.
कुंडलिक गायकवाड, रा .हिवरखेडा ता .सेनगाव .जि हिंगोली