जळोची – बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून तब्बल 62 लाख 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सुखनाम दिलज्योत सिंग (वय 56 रा. कोटदाना, राजस्थान) याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 पुणेचे निरीक्षक यांना बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील रंगीला राजस्थान ढाब्याच्या आवारात टॅंकर लावून वाहन चालक आरोपी सुखनाम सिंग हा टॅंकरमधील अतिशुद्ध मद्यार्क चोरून ढाबा चालक भार्गव यास विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकून भरारी पथकाने 16 चाकी टॅंकरसह (एमपी 09 एचजे 0277) सुमारे चाळीस हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट) प्लॅस्टिक कॅन, पाइप असा एकूण तब्बल 62 लाख 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.