रेमडेसिविरच्या उत्पादनाला मायलॅन कंपनीला परवानगी

नवी दिल्ली- कोविड-19 च्या उपचारासाठी आपत्कालिन परिस्थितीत मर्यादित प्रमाणात उपयोगासाठी रेमडेसिविरचे उत्पादन करायला मायलॅन एनव्ही या औषध कंपनीला “ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने परवानगी दिली आहे. या औषधाच्या 100 मिलीग्रॅमच्या लहान बाटलीची किंमत 4,800 रुपये इतकी असेल आणि याच महिन्यात हे औषध रुग्णांना उपलब्ध होऊ शकेल, असे मायलॅन एनव्हीने म्हटले आहे.

रेमडेसिविरचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी सिप्ला आणि हिटेरो या कंपन्यांना यापूर्वीच परवानगी दिली गेलेली आहे. या दोन कंपन्यांबरोबर आता मायलॅन एनव्ही कंपनी देखील रेमडेसिविरचे उत्पादन आणि वितरण करणार आहे. कोविड-19 च्या आपत्कालिन उपचारासाठी या रेमडेसिविरचा उपयोग केला जाणे अपेक्षित आहे.

प्रौढ आणि लहान मुलांना करोनाची गंभीर बाधा झाल्याचे प्रयोगशाळातील चाचण्यांद्वारे निदान झाल्यास या औषधाचा वापर करण्यास मंजुरी दिली गेली आहे. “डेस्रेम’ या नावाने हे औषध भारतात उपलब्ध होणार असून रुग्णांसाठी ते 4,800 रुपयांना उपलब्ध असणार आहे. विकसित देशांमध्ये ब्रॅन्डेड औषध ज्या किंमतीला उपलब्ध आहे, त्यापेक्षा ही किंमत 80 टक्के कमी आहे, असे मायलॅन कंपनीने म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.