“शिववरद’तर्फे नागरिकांच्या आरोग्याची योग्य काळजी

नगर – करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. करोनावर प्रतिबांधत्मक लस नसल्याने या जीवघेण्या आजरापासून वाचण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यासाठी शिववरद प्रतिष्ठान नागरीकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत असल्याचे प्रतिपादन महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी केले.

ज्येष्ठ नेते किशोर डागवाले यांच्या पुढाकाराने शिववरद प्रतिष्ठानतर्फे प्रभागातील नागरिकांना होमियोपॅथी औषध वाटपास प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. रंगारगल्ली, आनंदी बाजार, चितळे रोड, लक्ष्मीकारंजा परिसरातील 1300 कुटुंबांमधील सुमारे पाचर हजार नागरिकांना रोग प्रतिकारशक्ती वाढणारे आर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथी औषधांच्या गोळ्या वाटण्यात आल्या.

जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोखरणा, होमियोपॅथी तज्ञ डॉक्‍टर अक्षय भुसे, शिववरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन डागवाले, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुभाष दारव्हेकर, हुसेन सय्यद, बळवंत गोगटे, शहाजी डफळ, बाळासाहेब वैद्य, प्रदीप पत्की, रोहन डागवाले, सागर गोरे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.