Bengaluru Bulls vs Puneri Paltan, Pro Kabaddi League 2023-24 (New Delhi) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या लढतीत पुणेरी पलटण संघाने बंगळुरु बुल्स संघावर 40-31 अशी मात केली. जयपुर पिंक पॅंथर्स पाठोपाठ प्लेऑफमध्ये स्थआन मिळवलेल्या पुणेरी संघासाठी हा सामना केवळ एक सराव ठरला.
Paltan force proved to be too good for the Bulls 🔥🔥
Aslam Inamdar & Co. deliver another emphatic performance to beat Bengaluru Bulls by 9️⃣ points 💪#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #HarSaansMeinKabaddi #BLRvPUN #BengaluruBulls #PuneriPaltan pic.twitter.com/bpTM3vtYai
— ProKabaddi (@ProKabaddi) February 7, 2024
या सामन्यातील पहिल्या सत्रात अपेक्षेप्रमाणे पुणेरी संघानेच वर्चस्व राखले. त्यांच्या संघाने यापूर्वीच स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला असल्याने हा सामन्या त्यांच्यासाठी केवळ एक औपचारीकताच ठरणार होता. मात्र, तरीही त्यांनी अत्यंत गांभीर्याने खेळ करत पहिल्या सत्रात बंगळुरु संघावर दडपण राखले. त्यांनी आश्वासक चढाया तर केल्याच परंतू मोक्याच्या क्षणी रेड गुणही प्राप्त केले.
पुणेरी संघाचे मोहित गोयात, अस्लम मुस्तफा यांनी बंगळुरुच्या खेळाडूंना फारशी संधीच दिली नाही. या सत्रात पुणेरी संघाने 18 विरुद्ध 13 अशी पाच गुणांची आघाडी घेतली. बंगळुरु संघाच्या सुशील व अक्षितने चांगला प्रतिकार केला. त्यांनी पकडीही केल्या मात्र, ते गुणांची पिछाडी भरून काढू शकले नाहीत. पुणेरी संघाचा आकाश शिंदे बचावात तसेच चढाया करताना इतका भन्नाट होता की त्याच्या खेळासमोर बंगळुरुच्या एकाही खेळाडूकडे कोणतेही उत्तर नव्हते.
#PKLSeason10 (#CHEvUP Match 108) : तमिळ थलैवाज प्लेऑफच्या शर्यतीत कायम; युपी योद्धास केलं पराभूत…
दुसरे सत्र सुरु झाल्यावरही चित्र वेगळे नव्हते. पुणेरी संघाच्या खेळावर वर्चस्व राखण्यासाठीची एकही योजना बंगळुरुकडे नव्हती. ते पूर्णपणे कोरी पाटी घेउनच या सामन्यात उतरलेल्या नवख्या खेळाडूसारखे गोंधळलेले होते. दुसर्या सत्रातही पुणेरी संघाने आपली आघाडी वाढवताना एकवेळ 31 विरुद्ध 15 असे वर्चस्व राखले. बंगळुरु संघाने त्यानंतर लढत देत गुणांचटी भरपाई करण्याचा प्रयत्न केला मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.