सिलचर – कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज आसामातील सिलचर येथे कॉंग्रेस उमेदवार सुष्मिता देव यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. यावेळी बोलताना त्यांनी मोदींच्या कारभारावर सडकून टीका करताना मोदींनी आपल्याच वाराणसी मतदार संघातील लोकांना दूर लोटल्याचा आरोप केला. मतदारांनी विविध राजकीय पक्षांचे जाहींरनामे वाचून कोणत्या पक्षाचा नेमका कार्यक्रम काय आहे हे अभ्यासूनच मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. भाजपचा सारा कारभार घटनेतील तत्वांची पायमल्ली करणारा होता तर कॉंग्रेसने गरीबांसाठी आपल्या जाहींरनाम्यात न्याय सारखी योजना आणून घटनेतील तत्वांचा आदरच राखला आहे असे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या जाहींरनाम्यात विविध धर्मियांना किंवा भिन्न संस्कृतीला स्थान देण्यात आलेले नाहीं असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रियांका गांधी यांनी मोदींनी वाराणसीकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडला. त्या म्हणाल्या की वाराणसीतील लोकांनी आपल्याला सांगितले की मोदींनी आमच्यापैकी कोणासाठीही पाच मिनीटांचाहीं वेळ दिला नाहीं. त्यांनी अमेरिका, चीन, रशिया, अफिक्रा अशा देशांना भेटी देऊन तेथील लोकांना त्यांनी अलिंगन दिले पण वाराणसीतल्या जनतेला मात्र त्यांनी दूर लोटले असे त्या म्हणाऱ्या. पाकिस्तानला जाऊन त्यांनी बिर्याणी खाल्ली पण वाराणसीतील एकाहीं कुटुंबाची चौकशी करावी असे त्यांना वाटले नाहीं. लोकांचा आवाज न ऐकणाऱ्या या सरकारला सत्तेवरून पायउतर करा असे आवाहनही त्यांनी केले.