मुंबई – प्रियांका चोप्राने आपले आत्मचरित्र लिहून पूर्ण केले आहे. “अनफिनिश्ड’ हे आत्मचरित्र आपले लिहून पूर्ण झाले असल्याचे तिने ट्विट करून आपल्या फॅन्सना सांगितले होते. यातच प्रियांकाने लिहिलेलं ‘अनफिनिश’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. विशेष म्हणजे हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये त्याने एक रेकॉर्ड केला आहे.
View this post on Instagram
याविषयी प्रियांकाने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. “केवळ १२ तासांपेक्षा कमी कालवधीत ‘अनफिनिश’ला लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थान दिल्यामुळे मनापासून आभार. मला आशा आहे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल”, असं ट्विट प्रियांकाने केलं आहे.‘
View this post on Instagram
आपल्या आत्मशोधातून आणि जीवनाच्या प्रतिबिंबातून आपल्याला हे आत्मचरित्र लिहण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या “बकेट लिस्ट’मधील कामांच्या यादीवर जेंव्हा खूण केली जाते, तेंव्हा पूर्णत्वाचा आनंद मिळतो, असे तिने म्हटले आहे. प्रियांकाने आत्मचरित्र लिहीणार असल्याची घोषणा जुन 2018 मध्ये केली होती.
View this post on Instagram
“अनफिनिश्ड’मध्ये काही निबंध, कलाकार, निर्माती, गायिका आणि युनिसेफची सदिच्छादूत म्हणून आलेले अनुभव, निरीक्षण आणि कथांचाही समावेश असणार आहे. प्रियांका चोप्राने एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण जबाबदाऱ्या आणि भूमिका पार पाडल्या आहेत.
View this post on Instagram
वयाच्या 17 व्या वर्षी ती “मिस इंडिया’ आणि त्यापाठोपाठ “मिस वर्ल्ड’देखील बनली. बॉलिवूडमध्ये जम बसवल्यावर तिने “क्वांटिगो’सारख्या नावाजलेल्या टीव्ही सीरिजमधून जगभरात आपली ओळख निर्माण केली. निर्मिती आणि युनिसेफची सदिच्छादूत म्हणूनही तिने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.