अभिनेत्री प्रियांका चोपडा आपल्या प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करत असते. प्रियंका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून प्रियांका नेहमीच आपल्या चाहत्यांना आपल्या लाईफचे अपडेट देत असते. प्रियंकाने जेव्हा पासून आपल्या लेकीच्या फोटो चाहत्यानासोबत शेअर केला तेव्हा पासून ती नेहमीच आपल्या लेकीबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अशात आता मालती २ वर्षांची झाली आहे. प्रियंका तिच्या सोबत खूप जास्त वेळ घालवतांना दिसते, अशात लेकीला प्रियांका सेल्फी घायला शिकवत आहे. नुकतेच प्रियंकाने काही फोटो शेअर केले यात ती मालती सोबत दिसत आहे. हे फोटो स्वःताहा मालतीने क्लिक केले असे प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहले आहे. प्रियंकाने मालतीचे खूप \फोटो शेअर केले आहे. या फोटोत मालतीचा चेहरा पूर्ण दिसत नाहीये या फोटो तिचा अर्धाच फोटो दिसून येत आहे. यातील काही फोटो ब्लर दिसत आहे.
प्रियंकाने मालती सोबतचा सेल्फी शेअर करत लिहिले आहे की,’तिने काही सेल्फी घेतल्या. प्रियांकाने इमोजीसह पुढील फोटो पोस्ट केला. काही फोटोंमध्ये मालतीची पोनीटेल तर काहींमध्ये क्लिप दिसत आहे’
प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती येत्या काही दिवसांत ‘सिटाडेल 2’, ‘हेड्स ऑफ स्टेट’ आणि हिंदी फीचर ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी प्रियांकाने रिचीशी हातमिळवणी केल्यास तिच्या खात्यात आणखी एक प्रोजेक्ट जमा होईल.