अभिनेत्री तापसी पन्नू डंकी चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे, ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तापसीने सांगितले की, ‘चित्रपट साइन केल्यानंतरही ती या चित्रपटाचा एक भाग आहे यावर विश्वास बसत नव्हता.’
तिने असेही सांगितले की, इंडस्ट्रीत अफवा आहे, ती फक्त असेच चित्रपट करते ज्यात ती मुख्य भूमिकेत दिसते. या अफवांमुळे अनेक प्रोजेक्ट तिच्या हातातून निसटले आहे. या अफवांमुळे बडे दिग्दर्शक तापसीकडे चांगल्या भूमिका करण्यास विचारण्यासाठी कचरतात. चित्रपटसृष्टीतील तापसीबद्दल लोक काय विचार करतात याबद्दलही तिने सांगितले.
तापसी म्हणाली, ‘हा एक मोठा गैरसमज आहे जो मी दूर करून थकले आहे. चित्रपटात माझे पात्र केंद्रस्थानी नसेल तर मी चित्रपट करत नाही, असे अनेकदा म्हटले जाते. माझ्या विरोधात या सर्व गोष्टी कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही. मला वाटते की, अनेक मोठे चित्रपट माझ्याकडे न येण्याचे हे देखील एक कारण असू शकते कारण असे मानले जाते की मी ते करणार नाही. मी त्या गटाचा भागही नाही जिथे माझे नाव लगेच घेतले जाईल.’
डंकी हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान, विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी यांसारखे कलाकार दिसले. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 447.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे.