प्रियांका चोप्राचा थ्रोबॅक फोटो : प्रियांका चोप्राने तिचा 22 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर रणवीर सिंगने कमेंट केली, देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.ती अनेकदा तिचे थ्रोबॅक (जुने फोटो) फोटोही शेअर करत असते. कधी लहानपणीचे आहे तर कधी चित्रपट सृष्टीत आल्यांनतर सुरुवातीच्या दिवसांचे. आता प्रियांका चोप्राने तिचा 2000 सालचा एक फोटो शेअर केला आहे, मालदीव मध्ये काढलेला तिचा हा फोटो आहे.
View this post on Instagram
हातामध्ये बांगड्या, कपाळावर टिकली असा हा तिचा बिकिनीवरचा हटके फोटो तिने शेअर केल्यानंतर तिच्या या फोटोवर चाहत्यांपासून ते प्रसिद्ध सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या कमेंट येत आहेत. विशेष बाबा म्हणजे अभिनेता रणवीर सिंगने तिच्या या फोटोवर एक खास कमेंट केली आहे. त्याने पंजाबी स्टाइल में Bruhhhअसं कमेंटमध्ये लिहिलं आहे
अभिनेता रणवीर सिंगने केलेल्या कमेंटवर इतर युजरच्या अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत
या कमेंट्समध्ये प्रियांका चोप्राचा पती निक जोनासपासून अभिनेता रणवीर सिंगपर्यंतचा समावेश आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत देसी गर्ल प्रियंका चोप्राने लिहिले, ‘नोव्हेंबर 2000. 18 वर्षांची मी.’