मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राची सध्या खूप चर्चा होत आहे, मात्र चर्चेचे कारण तिचा फोटो किंवा व्हिडिओ नसून अभिनेत्रीचा आगामी चित्रपट आहे. प्रियांका चोप्रा ज्युनियर एनटीआर सोबत दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा आहे.
प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. ती अनेकदा काहीतरी नवीन खुलासा करून चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. प्रियांकाची नवीन वेब सिरीज Citadel रिलीज झाली. यामध्ये ती अॅक्शन करताना दिसत आहे. यानंतर चाहते प्रियांकाच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या मालिकेनंतर आता प्रियांका चोप्राचे नाव नव्या चित्रपटाशी जोडले जात आहे. एवढेच नाही तर प्रियांकासोबत या चित्रपटात साऊथचे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. प्रियांका चोप्राची सध्या खूप चर्चा होत आहे, मात्र चर्चेचे कारण तिचा फोटो किंवा व्हिडिओ नसून अभिनेत्रीचा आगामी चित्रपट आहे.
प्रियांका चोप्रा ज्युनियर एनटीआर सोबत दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या चित्रपटात दिसणार असून. हा चित्रपट भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असू शकतो. या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण आणि मृणाल ठाकूर यांचीही चर्चा झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. पण प्रियंका चोप्राने या चित्रपटासाठी फायनल झाले आहे.
दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाव्यतिरिक्त ज्युनियर एनटीआर देवराबद्दल चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान आणि जान्हवी कपूर देखील दिसणार आहेत. याशिवाय तो वॉर २ बद्दलही चर्चेत आहे.