साऊथ सुपर स्टार प्रभासचा नुकताचआदिपुरूष चित्रपटाचा नवा टिझर लाँच झाला या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रभासने तिरुपति बालाजीचे दर्शन घेतले. ओम राऊत यांनी निर्देशन केलेल्या आदिपुरुष चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनवेळी मीडियाने जेव्हा प्रभासला लग्नाबाबत विचारले तेव्हा तो हसला, आणि पुढे म्हणाला लवकरच तिरुपति मंदिररात लग्न करणार आहे. प्रभासचा लग्न करणार असल्याचं ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे.
प्रभास कोणाशी आणि कधी लग्न करणार हे प्रभासने सांगितले नाही. प्रभासचे नाव बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननसोबत बऱ्याच दिवसांपासून नाव जोडले जात आहे. मात्र, प्रभास आणि क्रिती या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाकारले आहे.
दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त सैफ अली खान, क्रिती सेनॉन, देवदत्त गजानन नागे, सोनल चौहान, वत्सल सेठ आदी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात प्रभास भगवान राम, कृती माता सीता, सैफ अली यांची भूमिका साकारत आहे. खान लंकेश रावण आणि सनी सिंह लक्ष्मण दिसणार आहेत