कोल्हापूर – आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली असून मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र या मोर्चादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. कोल्हापूरातील अनेक दुकाने आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे.
हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापूर बंदची हाक दिल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आधीच जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. मात्र तरीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आधीच जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. या आंदोलानादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच औरंगाबादेत औरंगजेबाचा फोटो फडकवणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यानंतर आंदोलकांची एकच पळापळ सुरू झाली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंटरनेटसेवाही उद्या संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आले आहे.