अमेरिकेत साजरा केल्या जाणाऱ्या “नॅशनल सेल्फी डे’ निमित्ताने देसी गर्ल प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर आपले काही सेल्फी पोस्ट केले आहेत. केवळ 6 तासांत या पोस्टला तब्बल 5 लाख जणांनी लाईक केले आहेत.
“नॅशनल सेल्फी डे’ अमेरिकेत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपले वेगवेगळ्या स्टाईलमधील सेल्फी सशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी हे एक अधिकृत निमित्त आहे. प्रियांकाने आपला सेल्फी पोस्ट करून या दिवसाच लोकप्रियता वाढवली आहे.
अलीकडेच तिला व्हिक्टोरिया सिक्रेटची ब्रॅन्ड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले गेले आहे. त्याचा आनंदही तिने इन्स्टाग्रामवर व्यक्त केला आहे. प्रतिनिधित्व करणे खूप आनंददायी असते, असे तिने म्हटले आहे.
अन्य वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर राजकुमार रावबरोबर ती “द व्हाईट टायगर’मध्ये होती. याशिवाय “सिटाडेल’ नावाची एक वेबसिरीजदेखील ती करते आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर रिचर्ड मॅडन लीड रोलमध्ये असणार आहे. बॉलीवूडमधील तिचा पुढचा सिनेमा 2022 मध्ये रिलीज होणार आहे. त्याबाबतचा तपशील प्रियांका चोप्राने आता लगेच सांगितला नाही.