पुण्यात विकसित झाले स्वदेशी हवाई तंत्रज्ञान

* “डीआरडीओ’ची प्रयोगशाळा “एआरडीई’च्या टीमचे महत्त्वपूर्ण योगदान
* कमीतकमी वेळात पायलटची सुलभ सुटका होणार
 
पुणे  – हवाई दलातील भारतीय बनावटीचे लढाऊ विमान असलेले “तेजस’ आणि प्रशिक्षण विमान असलेले “एचटीटी-36′ विमान व “एचटीटी -40′ विमानांमधून अपघातावेळी वैमानिकांना जलद गतीने आणि सुरक्षितरित्या बाहेर पडत यावे, यासाठी “विमानछत विच्छेदन प्रणाली'( कॅनॉपी सेव्हरन्स सिस्टम-सीएसएस) विकसित करण्यात आली आहे.

भारतीय बनावटीची ही प्रणाली पुण्यात विकसित करण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संघटनेची (डीआरडीओ) पुण्यातील प्रयोगशाळा असलेल्या आर्मामेन्ट रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट इस्टब्लिशमेंट (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरीच्या (एचईएमआरएल) विद्यमाने हे संशोधन करण्यात आले आहे.

डीआरडीओचे वैज्ञानिक आणि शस्त्रे व लढाऊ अभियांत्रिकी विभागातील महानिदेशक पी. के. मेहता यांच्या उपस्थितीत एआरडीई येथे या प्रणालीचे ट्रान्सफर ऑफ टेक्‍नॉलॉजी प्रमाणपत्र पुरस्कार समारंभ नुकतेचआयोजित करण्यात आला होता. यावेळी “एचईएमआरएल’चे वैज्ञानिक आणि संचालक केपीएस मूर्ती यांच्या हस्ते जीओसीएल कॉर्पोरेशन लिमि. कंपनीचे अध्यक्ष एस. प्रमणिक आणि महाव्यवस्थापक आर. चंद्रा यांना हे तंत्रज्ञान सुपुर्द करण्यात आले.

कमीतकमी वेळात पायलटची सुलभ सुटका करण्यासाठी हे छत सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देते. सध्या, सीएसएस 25 तेजस, 12 एचजेटी -36, 2 एलसीए ट्रेनर आणि नेव्हल आवृत्त्या आणि दोन एचटीटी -40 विमानांवर बसविण्यात आली आहे.

सर्व विमानांची सीएसएस ऑनबोर्डसह चाचणी उड्डाणे आहेत. एचएएलने तेजस विमानासाठी 105 सीएसएस सेट आणि एचटीटी -40 विमानासाठी 75 सीएसएस सेटच्या उत्पादन आणि पुरवठ्यासाठी मागणी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.