सिंगापूर – सिंगापूरच्या संसदेत भारतीय वंशाचे नेते प्रीतमसिंग यांना विरोधी पक्ष नेत म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. अशी संधी मिळालेले ते पहिलेच भारतीय वंशाचे नेते आहेत.
गेल्या जुलै महिन्यात सिंगापूरमध्ये संसदेच्या निवडणूका झाल्या. त्यात सिंग यांच्या वर्कर्स पार्टीला 93 पैकी दहा जागा मिळाल्या होत्या. त्या पक्षाने प्रीतमसिंग यांची या पदावर नियुक्ती केली होती. त्याला आज संसदेने मान्यता दिली.
सभागृहाच्या नेत्या इंद्राणी राजा यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. त्या स्वत:ही भारतीय वंशाच्याच आहेत. सिंगापूरच्या संसदेत पीपल्स ऍक्शन पार्टीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यांना 80 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. या निवडीचे पंतप्रधान ली यांनी स्वागत केले आहे.
सिंग यांना त्यांची जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडता यावी यासाठी आवश्यक तो निधी आणि कर्मचारी वर्गही दिला जाईल असे त्यांनी सांगितले.