वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असून त्या समस्या सोडवून नागरिकांना दिलासा तातडीने मिळवून देण्यात येईल असे आश्वासन माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिले.
भारतीय जनता पार्टी तर्फे वाघोलीमधील समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांचे चर्चासत्राचे व वाघोली शहर बूथ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करताना माजी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक प्रभारी वाघोली शहर योगेश मुळीक बोलत होते.
या बैठकीला भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, पुणे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे , व्यापारी आघाडी अध्यक्ष जयप्रकाश सातव , पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव, गणेश सातव, विजय जाचक, व महानगरपालिकेतर्फे पालिका सहाय्यक आयुक्त सुहास जगताप, संपर्क अधिकारी उपअभियंता प्रमोदजी मुळे , विभागीय आरोग्य निरीक्षक शंकर जगताप, आरोग्य निरीक्षक समीर खुळे,उपस्थित होते.
याप्रसंगी समस्त वाघोली ग्रामस्थ शहर बुथ प्रमुख भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हवेली तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील, वाघोली शहर भाजपा अध्यक्ष केतन जाधव यांनी परिश्रम घेतले.
“वाघोली तालुका हवेली येथील सांडपाणी, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आदी प्रश्न सोडविण्याबाबत भाजपाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.”
– अनिल सातव पाटील
हवेली तालुका अध्यक्ष, युवा मोर्चा