वाघोली – वाघोली येथील कोकणात पूर आलेल्या वडवली, नांदगाव, एस टी स्टॅन्ड महाड पूरग्रस्त भागात नागरिकांना जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार यांनी सांगितले.
तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद रामभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतून पूरग्रस्त बांधवांना तातडीने मदत करावी या हेतूने तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने तातडीने एक पथक जीवनावश्यक वस्तू व संसारोपयोगी साहित्य घेऊन कोकण परिसरात गेले होते या ठिकाणी प्रत्यक्ष अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदतीचे वाटप करून संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या उपक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, माजी उपसरपंच समीर भाडळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, सोनल शाह आदींनी सहकार्य केले असल्याचे संस्थेचे अध्यक्षा सारिका पवार यांनी सांगितले.