लंडन – ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स हॅरी याने आपल्या आयुष्यातील घटनांवर आधारित लिहिलेल्या पुस्तकाची जगात सर्वत्र सध्या चर्चा आहे स्पेअर अशा नावाच्या या पुस्तकाची जगभरात विक्रमी विक्री झाली असून प्रिन्स हॅरीने राजघराण्यातील अनेक अनुभवांचा या पुस्तकामध्ये गौप्यस्फोट केला आहे 10 जानेवारी रोजी ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या पहिल्याच दिवशी अमेरिका कॅनडा आणि ब्रिटनमध्ये या पुस्तकाच्या तब्बल चार लाख प्रति विकल्या गेल्या राज घराण्यातील सर्वात दुर्लक्षित व्यक्ती म्हणून प्रिन्स हॅरी यांच्याकडे पाहिले जाते मेघन मार्कल या सर्वसामान्य तरुणीशी लग्न केल्यानंतर राजघराणे त्याच्यावर नाखुश होते याबाबतचे अनेक अनुभवांची नोंद या पुस्तकांमध्ये प्रिन्स हॅरीने केली आहे 2 वर्षापूर्वी प्रिन्स हॅरीच्या आजोबांचे निधन झाले तेव्हाच प्रिन्सने अशा प्रकारचे पुस्तक लिहिण्याचा विचार केला राजघराण्यामध्ये आपल्याला कशा प्रकारची चुकीची आणि दुर्लक्षित वागणूक दिली जात होती याची अनेक उदाहरणे या पुस्तकांमध्ये त्याने वर्णन केली आहेत.
राणी एलिझाबेथ यांचे नुकताच निधन झाले पण त्यांच्या निधनाची माहितीही अधिकृतरित्या प्रिन्स हॅरी किंवा मेगन मार्कल याना कळविण्यात आली नव्हती 17 व्या वर्षीच अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे लागलेले व्यसन किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलांबरोबर संबंध ठेवणे किंवा मोठा भाऊ प्रिन्स विल्यमकडून मारहाण होणे अशा अनेक अनुभवांचे कथन या पुस्तकांमध्ये प्रिन्स हॅरी याने केले आहे तसेच मेघन मार्कशी लग्न केल्यानंतर आपल्याला राजघराणे आणि राजवाडा का सोडावा लागला याचे सविस्तर विवरण ही या पुस्तकात प्रिंसने केले आहे.
एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स यांनी आपल्या मुलाला फोन करून निधनाची बातमी दिली होती पण अंत्यसंस्काराला येताना मेघनला घेऊन येऊ नकोस असे स्पष्टपणे त्याला बजावण्यात आले होते प्रिन्स हॅरी ने आपली आई लेडी डायनस यांच्याबाबतही काही अनुभव सांगितले आहेत डायना यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करणारी माहिती ही या पुस्तकात प्रिंसने दिली आहे ब्रिटिश लष्करामध्ये काम करत असताना कर्तव्याचा भाग म्हणून त्याने 25 तालिबानी दहशतवाद्यांना ठार मारले होते या कृत्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही असे असेही प्रिन्स हॅरीने म्हटले आहे.