मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या परदेश दौऱ्यावर असून त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. सध्या ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून त्यांचे या ठिकाणी हवाई स्वागत करण्यात आले आहे. कारण त्यांच्या स्वागतासाठी आकाशात ‘welcome modi’ असे लिहिले गेले होते. याविषयीचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये हवेत निळ्या आकाशात पांढऱ्या रंगाचे इंग्रजी अक्षरात ‘welcome modi’ असे लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून विदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक देशांच्या प्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यांच्यवर स्तुतीसुमने उधळली आहेत. तर त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
#WATCH ऑस्ट्रेलिया: सिडनी में सामुदायिक कार्यक्रम से पहले एक मनोरंजक विमान के कॉन्ट्रेल्स द्वारा वेलकम मोदी लिखा गया। pic.twitter.com/M5bsGBRBWp
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023
2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना ‘अब्दुलाझीझ अल सौद’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला होता. त्याचबरोबर 2016 साली मोदींना ‘अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार’ या अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
“श्रीमद्भगवद्गीतेतील सनातन विचारधारेच्या आधारावर भारत विश्वगुरू बनेल. फळाची अपेक्षा न करता काम केल्यास जीवनात यश मिळेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. त्यानंतर भारताने विश्वगुरू बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पावले उचलत असल्याचं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले होते.