Maharashtra Congress| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी जागा वाटपबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. काही आघाड्यांची ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असली, तरी अंतिम निर्णय अजूनही चर्चेत आहे. मात्र येत्या 9 मार्चला ती जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई सोडून राज्यातील या 19 ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसने अमरावती, अकोला, जालना, नांदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे ,भिवंडी, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, रामटेक, नागपूर या मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेतला. तर उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
या उमेदवारांच्या नावाची चर्चा
यात काँग्रेसने भंडारा-गोंदिया- नाना पाटोले, चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, नांदेड- वसंतराव चव्हाण, आशा शिंदे, अमरावती- बळवंतराव वानखेडे, किशोर बासेकर, लातूर – अमित देशमुख, सोलापूर- प्रणिती शिंदे, कोल्हापूर- शाहू महाराज, पुणे – रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे या विविध मतदारसंघात काँग्रेसने या नावांबाबत चाचपणी केली. Maharashtra Congress|
जागा वाटपाबाबत 9 मार्च रोजी अंतिम निर्णय होण्याची शक्यता
महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांवर बोलणी सुरू आहे. दुसरीकडे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडीची बुधवारी महत्त्वाची बैठक झाली असून त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतला होता. काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काही जागांवर वंचितने दावा केला असून त्यावरच चर्चा करण्यात आली. वंचितचा प्रस्ताव मविआने स्वीकारला असून त्यावर 9 मार्च रोजी अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Maharashtra Congress|
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. यापैकी 2 जागा वंचितला तर राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारी हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना दिली जाईल, अशी चर्चा आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा: