Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. अशात सत्तेत असलेल्या भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजप पक्षातील हायप्रोफाईल नेत्यांसह कलाकारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्रतील भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव या यादीत नसल्यामुळे आता विरोधकांडून भाजप पक्षांवर निशाणा साधण्यात येत आहे. तर दुसरीकडे अशीही चर्चा सुरु आहे की,’नागपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस नितीन गडकरी विरोधात कोणाला उमेदवारी देणार ?’
दरम्यान राजकीय वर्तुळात सध्या जागांचे वाटप, उमेदवारांची निवड, संघटना मजबूत करणे या सर्व मुद्यावरून चर्चा होत आहे. अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यास त्यांच्या विरोधात नागपुरातून उमेदवार कोण ? गडकरींच्या विरोधात काँग्रेस पक्ष कोणाला मैदानात उतरवेल ? आणि काँग्रेसच्या नेत्यांनी गडकरीं विरोधात निवडणूक लढण्यास नकार दिल्याचीही असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर लोकसभा मतदार संघाचा इतिहास काय सांगतो
नागपूर लोकसभा मतदारसंघ २००४ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर १९७७ ते २०१४ पर्यंत इथून काँग्रेसचे उमेदवार कोणत्याही अडचणीशिवाय विजयी होऊन खासदार व्हायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असूनही येथे भाजप कधीच मजबूत नव्हता. मात्र १९९६ वगळता ही जागा नेहमीच काँग्रेसकडे होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांचा तब्बल 2,16,009 मतांनी पराभव केला होता. 2014 च्या तुलनेत गेल्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य काहीसे घटले होते.
2004 सालापासून निरीक्षण केले असल्यास नागपूर शहरात भाजपचा वरचष्मा पहायला मिळतो. सद्यस्थितीत नागपूर महानगरपालिकेवर प्रशासन राज आहे. मात्र गेल्या 15 वर्षापासून महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत नागपुरात कमळ उमलल्याचे दिसते.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
-वर्ष- 2019: नितीन गडकरी (विजयी उमेदवार- भाजप) 55.67% मतं
-वर्ष- 2014: नितीन गडकरी (विजयी उमेदवार- भाजप) 54.17% मतं
-वर्ष- 2009: विलास मुत्तेमवार (विजयी उमेदवार- काँग्रेस) 41.72% मतं
-वर्ष- 2004: विलास मुत्तेमवार (विजयी उमेदवार- काँग्रेस) 47.17% मतं
-वर्ष- 1999: विलास मुत्तेमवार (विजयी उमेदवार- काँग्रेस) 52.38% मतं
अशात आता गेल्या काही वर्षात नागपूर शहरात भाजपचा वरचष्मा पहायला मिळाला असून गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडण्यासाठी तयारी अंतिम टप्पात आली आहे. पक्षाकडून नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांकडून पक्षाने अर्ज मागवले आहे. नागपूर शहरातील ३८ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणारे अर्ज सादर केले. निवेदन देणाऱ्यांमध्ये प्रफुल्ल गुडधे, राष्ट्रीय सचिव नितीन कुंभलकर, नयना झाडे, रमण पैगवार, गजराज हातेवार, अण्णाजी राऊत आदी बड्या नेत्यांचा समावेश होता. मात्र काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा
सावधान…! तुम्हीसुद्धा डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या बनावट औषध घेत तर नाही ना… ?