ढगाळ हवामानाची धास्ती, पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली पण…

लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, काेबीच्या भावात घट

पुणे  – उत्पादन वाढले पण, त्यातच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी पीक बाजारात आणले आहे. त्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, फ्लॉवर आणि कोबीच्या भावात घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

 

 

रविवारी येथील बाजारात 90 ते 100 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून 10 ट्रक गाजर, कर्नाटक, गुजरात येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, कर्नाटक आणि तामिळनाडू येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथुन शेवगा 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटार 25 ट्रक, तर मध्यप्रदेश आणि गुजरात येथून 14 ते 15 ट्रक आवक लसणाची झाली होती.

 

 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1400 ते 1500 गोणी, कोबी सुमारे 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 6 ते सात हजार पेटी, भुईमुग शेंगा सुमारे 50 ते 60 गोणी, घेवडा 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, पावटा 5 ते 6 टेम्पो, कांद्यामध्ये जुना 100 ट्रक, तर नवीन कांद्याची 30 ट्रक इतकी आवक झाली.

 

 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 250-350, बटाटा : 250-300, लसूण : 400-900, आले : सातारी 100-200, भेंडी : 200-250, गवार : 200-250, टोमॅटो : 150-200, दोडका : 150-200, हिरवी मिरची : 200-250, दुधी भोपळा : 50-70, चवळी : 140-160 काकडी : 60-100, कारली : हिरवी 150-200, पांढरी 100-120, पापडी : 150-160, पडवळ : 160-180, फ्लॉवर : 30-40, कोबी : 50-80, वांगी : 60-100, डिंगरी : 140-150, नवलकोल : 60-80, ढोबळी मिरची : 120-140, तोंडली : कळी 180-200, जाड : 90-100, शेवगा : 700-750, गाजर : 160-220, वालवर : 240-260, बीट : 80-100, घेवडा : 200-250, कोहळा : 100-120, आर्वी: 100-120, घोसावळे : 160-200, ढेमसे : 180-200, पावटा : 250-300, भुईमूग शेंग : 400-500, मटार : 200-320, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 160-180, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.