मेष : व्यवसायात कल्पना प्रत्यक्षात साकार होतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. वातावरण चांगले राहील.
वृषभ : हितचिंतकांची मदत कामात होईल. येणी वसूल झाल्याने पैशाची तजवीज होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल.
मिथुन : व्यवसायात सावधतेने पावले टाका. पैशाच्या व्यवहारात चोख रहा. कामे मिळतील. नोकरीत सतर्क रहा.
कर्क : रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. नवीन उपक्रम कार्यान्वित होतील. घरात कामाचा ताण वाटेल.
सिंह : खेळत्या भांडवलाची गरज असेल तर त्यादृष्टीने प्रयत्न करा. महत्त्वाची कामे ओळखीतून होतील.
कन्या : ध्येयामुळे अभिलाषा वाढेल. आर्थिक स्थितीचा अंदाज घ्या. खेळत्या भांडवलाची सोय करावी लागेल.
तूळ : नवीन योजना साकार होतील. विरोधकांचा विरोध मावळेल. नोकरीत इतरांपेक्षा वेगळेपणा सिद्ध कराल.
वृश्चिक : कोणालाही आश्वासने देताना त्याची पूर्तता करू की नाही याची शहानिशा करून मगच पुढे जा.
धनु : व्यवसायात एकाच वेळी बरीच कामे हाती घ्याल. त्याकरिता योग्य व्यक्तिंची निवड कराल.
मकर : रेंगाळलेली कामे गती घेतील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या.
कुंभ : नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याची मुभा वरिष्ठ देतील. वेगळया पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल.
मीन : पूर्वी केलेल्या कामाचा आर्थिक व इतर स्वरूपात फायदा मिळण्याची तुमची इच्छा सफल होईल.