ढगाळ हवामानामुळे फुल उत्पादकांची लगबग, पण भाव गडगडले

आगामी लग्नसराईत मागणी वाढण्याची अपेक्षा

पुणे  – फुलांचे उत्पादन वाढले आहे. यातच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी फुलांची तोडणी वाढवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून फुलांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शोभिवंत फुलांना मागणी कमी प्रमाणात होत असल्याने भाव चाळीस टक्क्यांनी उतरले आहे.

 

 

सोमवारी अमावस्या असून, त्यानंतर तुरळक लग्नतारखांमुळे शोभिवंत फुलांना मागणी वाढेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात आली. 

 

 

दरम्यान, मंगळवारपासून (दि. 15) मार्गर्शीष महिना सुरू होत आहे. याकाळात सुट्ट्या फुलांना मागणी वाढून त्यांच्या भावाततही वाढ होईल, अशी आशा शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.

 

 

फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-20, गुलछडी :50-100, ऍष्टर : जुडी 12-16 सुट्टा 50-80, कापरी : 10-20, शेवंती : 60-80, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 15-25, गुलछडी काडी : 10-100, डच गुलाब (20 नग) : 50-150, जर्बेरा : 20-40, कार्नेशियन : 100-120, शेवंती काडी 150-250, लिलियम (10 काड्या) : 800-1200, ऑर्किड : 150-250.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.