हैद्राबाद – भारत सरकारच्या डीआरडीओ या संस्थेने करोना रुग्णांवर उपचारासाठी बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज ( 2- DG) च्या आपत्कालीन वापरासाठी सरकारने याच महिन्यात मंजुरी दिली होती. भारतातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. आता 2DG या औषधांच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.
या औषधाची किंमत डॉ. रेड्डीज लॅबने निर्धारित केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. की, 2DG औषध सरकारी रुग्णालयांमध्ये कमी किंमतीला उपलब्ध असेल. हे औषध केंद्र आणि राज्य सरकारांना कमी किंमतीत उपलब्ध केले आहे.
या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे. तसेच औषधाचे प्रोडक्शन डॉ. रेड्डीज लॅबकडून करण्यात येत आहे. ड्रग कंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला एमरजन्सी वापरासाठी परवानगी दिली आहे. 2DG ही ओरल ऍंटी कोविड औषध आहे. याला डॉक्टरांच्या सल्ल्याने करोना मॉडरेट आणि गंभीर रुग्णांसाठी दिले जाऊ शकते.
2 DG हे औषध जूनच्या मध्यापर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये देखील या औषधाचा सप्लाय सुरू होणार आहे. फार्मा कंपनीने 2DG ची किंमत 990 रुपये ठेवली आहे. या औषधाचा शोध DRDO चे इंन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन ऍंड एप्लाइड सायंन्सच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी लावला आहे.
हे औषध पावडर स्वरूपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावे लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचचे काम करते. त्यासोबतच रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचेही काम करते असा दावा करण्यात आला आहे.