Lightest Bullet Proof Jacket| संरक्षण क्षेत्रात भारत सातत्याने नवीन बदल करत मोठे यश मिळवले आहे. यातच आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील सैनिकासाठी हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे. त्यात सहा गोळ्यांनी भेद केला तरी जवानाचे रक्षण होणार आहे. डीआरडीओच्या या यशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
कोणी तयार केले जॅकेट ?
देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. कानपूर येथील डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) ने हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटची BIS 17051-2018 अंतर्गत TBRL चंदीगड येथे चाचणी घेण्यात आली.
काय आहे यात विशेष ? Lightest Bullet Proof Jacket|
बुलेटप्रूफ जॅकेट 7.62 X 54 R API दारुगोळ्यापासून संरक्षण प्रदान करण्यास सक्षम आहे. डीआरडीओच्या चाचणीत असे आढळून आले आहे की या जॅकेटवर एकामागून एक 6 शॉट्सचा कोणताही परिणाम होत नाही. विशेष बाब म्हणजे नवीन बुलेट प्रूफ जॅकेट अतिशय हलके असून सुरक्षा दलांना ते परिधान करणे सोपे जाईल अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, हे जॅकेट नवीन डिझाइन पद्धतीवर आधारित आहे, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण साहित्य आणि प्रक्रियांचा वापर करण्यात आला आहे. Lightest Bullet Proof Jacket|
डीआरडीओने बनवलेले लाइट बुलेट प्रूफ जॅकेट हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. खरे तर सध्या सैनिक वापरत असलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटचे वजन जास्त आहे. यामुळे गंभीर ऑपरेशनच्या वेळीही सैनिकांना अतिरिक्त भार सहन करावा लागतो. आता त्यांना यातून दिलासा मिळू शकतो. सचिव, संशोधन आणि विकास, संरक्षण विभाग आणि अध्यक्ष, DRDO यांनी हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केल्याबद्दल DMSRDE चे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा: