‘प्रादुर्भाव रोखा, करोना चाचण्या वाढवा’

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना : दि. 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण

पुणे – करोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी दिले.

जिल्ह्यात करोना चाचण्या वाढवण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा. येत्या 17 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यात बालकांना पोलिओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. देशमुख यांनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण, कोविड लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.