नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली. महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, 7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण 939 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम), 189 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 51 पदक मिळाली आहेत.
देशातील 88 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी–कर्मचा-यांचा समावेश आहे.
चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम)
विनय महादेवराव कोरगावकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक (पीसीआर), मुंबई
प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट 6, धुळे
चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे
अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड
राज्यातील एकूण सात पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’
गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलीस हवालदार
संजय गणपत्ती बकमवार, पोलीस हवालदार
भरत चितांमण नागरे, पोलीस उपनिरीक्षक
दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलीस हवालदार
निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलीस हवालदार
संतोष विजय पोटवी, पोलीस हवालदार.
पुण्यातील सात पोलिसांना पदक
चंद्रकांत रामभाऊ गुंडगे ( राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, (पीपीएम)
सीताराम लक्ष्मण जाधव (पोलीस पदक)
प्रकाश भिला चौधरी (पोलीस पदक)
पांडुरंग लक्ष्मण वांजळे (पोलीस पदक)
विजय उत्तम भोग (पोलीस पदक)
काशिनाथ मारुती उभे (पोलीस पदक)