मनिला – फिलिपाइन्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. फर्डिनांड मार्कोस ज्युनियर आणि मानवाधिकार वकील लेनी रॉब्रेडो यांच्यात ही निवडणुक होत आहे.
प्रसिद्धी माध्यमांनुसार देशातील पात्र 67.5 दशलक्ष मतदारांकडून जास्त मतदान अपेक्षित आहे. शाळा आणि मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी अनेकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. या निवडणुकीमुळे फिलीपाईन्समध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज पहाटे आलेल्या मतमोजणीच्या अनधिकृत माहितीनुसार फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी 61% पात्र मते मिळवून मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाची शक्यता अधिक मानली जात आहे.
मार्कोस हे फिलीपाईन्सचे विद्यमान अध्यक्ष दुतेर्तो यांचे पुत्र आहेत. दुतेर्तो यांत्या कार्यकाळात मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचा आरोप मार्कोस यांनी फेटाळून लावला आहे.