कोलोंबो – श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभरात उसळलेल्या हिंसाचारात सत्तारुढ पक्षाच्या एका खासदाराचा मृत्यू झाला आहे. पोलोन्नारुवा जिल्ह्यातील श्रीलंका पोदुजाना पेरामुना पार्टीचे खासदार अमरकीर्थी अथुकोराला यांना उत्तर-पश्चिमेकडील नितांबुवा शहरात सरकारविरोधी गटांनी वेढले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात अमरकीर्ती अथुकोराला आणि त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी मारले गेले, असे पोलिसांनी सांगितले.
त्यांच्या एसयुवी,मधून गोळीबार झाला आणि जेव्हा संतप्त जमावाने कार उलटवली तेव्हा त्यांनी पळ काढला आणि एका इमारतीत आश्रय घेतला. त्यानंतर संभाव्य हिंसाचार लक्षात घेऊन स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली, असे लोकांनी सांगितले.
त्यांनी आत्महत्या केली तोपर्यंत हजारो लोकांनी इमारतीला वेढा घातला होता. नंतर, खासदार आणि त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी मृत आढळले, असे पोलिसांनी सांगितले.
श्रीलंकेचे खासदार सनथ निशांत आणि माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ला करून आग लावली. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर, किमान 78 लोक जखमी झाले आणि अधिकाऱ्यांनी देशव्यापी संचारबंदी लागू केल्यानंतर काही तासांनी हा हिंसाचार घडला.
राजपक्षे समर्थक समर्थक राजधानी सोडून घरी परतत असताना जनतेने त्यांचा राग काढला. बहुतेक शहरांमध्ये त्यांची वाहने रोखून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले.