इंदापूर – इंदापूर शहरातील मैत्रीण ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे, ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनुराधा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवस विविध कार्यक्रम महिला वर्गासाठी पार पडले. यामध्ये गीत रामायणातील काही गीतांवर प्रसंगाचे हुबेहूब सादरीकरण मैत्रीण ग्रुपच्या महिला भगिनींनी सादर केले. शेकडो महिलांनी रामायणातील सादरीकरणाला दाद दिली.
आरोग्य शिबिर अल्फा बाईट इन्स्टिट्यूट येथे महिला वर्गांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये सांधे आजार, खोकला, सर्दी, डोकेदुखी, सांधेवात, भावनिक व मानसिक आजार या आजारावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर कविता रुपनवर विघ्नहर्ता क्लिनिक यांनी याकार्यक्रमात विशेष परीश्रम घेतले. तर ईसीजी तपासणी, रक्त तपासणी, शुगर तपासणी डॉक्टर रोहन हेगडे यांच्या हॉस्पिटल मध्ये मोफत पार पडली.
इंदापूर तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिला भगिनींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये स्मिता पवार सुवर्णा सलगर, पल्लवी पांडगुळे, सोनाली सरडे, यांना गौरवण्यात आले. लाखेवाडी गावच्या आदर्श सरपंच चित्रलेखा ढोले, भगवानराव भरणे प्रतिष्ठान तसेच सोनाई परिवाराच्या लताताई माने यांनी यासाठी सहकार्य केले. तसेच मुली व महिलांसाठी नृत्य स्पर्धा यामध्ये शहरातील असंख्य महिलांनी युवतीनी सहभाग नोंदवला. शितल शेटे, सारिका पवार, शारदा नागपुरे, हेमाताई माळुंजकर, मीना ढोले, वैशाली गावडे. तसेच भरणे प्रतिष्ठान यांनी नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
इंदापूर शहरात पहिल्यांदाच महिला वर्गासाठी मैत्रीण ग्रुपच्या वतीने प्रश्नमंजुषा कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. तर शेवटच्या पाचव्या दिवशी खाना खजिना आनंद मेळावा यामध्ये शहरातील महिलांनी स्टॉल उभारणी करत घरगुती गरम पदार्थ इंदापूरकरांना उपलब्ध करून दिला. गावाकडील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी नगरपालिकेच्या प्रांगणात झाली होती.
मैत्रीण ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा गारटकर, अध्यक्ष वैभवी दुणाखे, सचिव मीना ढोले, खजिनदार कांचन बानकर, यांनी उपस्थित महिला भगिनींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा इंगोले, रसिका देशपांडे, अर्चना काळपांडे, कांचन बानकर यांनी केले.