Ravi Dube In Ramayana Film| अभिनेता रणबीर कपूर याच्या रामायण चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा आहे. यात चित्रपटात रणबीर रामाची भूमिका सकारणार आहे. यात आता आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या सिनेमाबाबत मागील काही दिवसांपासून विविध अपडेट समोर येत आहे. यातच आता लक्ष्मणाची भूमिका कोण साकारणार? हे समोर आलं आहे.
‘रामायण’ या सिनेमात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याचं समोर आले आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘रामायण’ या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. साई पल्लवी, सनी देओल, बॉबी देओल, विजय सेतुपती या कलाकारांची देखील सिनेमात एन्ट्री झाली आहे. आता रवी दुबेची एन्ट्री झाल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिची देखील या एन्ट्री होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. रकुल शूर्पणखेच्या भूमिकेत दिसाणार असल्याचे म्हंटले जात आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्यानंतर सईला दुजोरा मिळाला.
हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलसोबत निर्मात्यांची बोलणे सुरू असल्याचेही म्हंटले जात आहे. तर कुंभकर्णाच्या भूमिकेत बॉबी देओल दिसणार असल्याची देखील चर्चा आहे. यातच आता रामायणात रवी दुबेची देखील एन्ट्री झाली आहे.
हेही वाचा:
Karale Guruji | ‘खदखद’ फेम कराळे गुरुजींनी शरद पवारांकडे मागितलं वर्धा मतदारसंघाचं ‘तिकीट’