कोरेगाव भीमा -येथे विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यासाठी शासनाचे विविध विभाग एकत्र येत काम करत आहेत.
कोरेगाव भीमा, तुळापुर फाटा, पेरणे फाटा येथे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत सुविधांबाबत सर्व आढावा घेतला व त्याबाबत महत्वाच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी कोरेगाव भीमा येथील पुणे नगर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या एसटी स्टॅंडच्या जागेची साफसफाई करण्यात आली.
तेथे पोलीस मदत केंद्र, आरोग्य विभाग मदत केंद्र, अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस दल, पि एम टी गाड्यांच्या थांब्यासाठी व वाहतुकीसाठी जागेची स्वच्छता करण्यात आली. कोरेगाव भीमा येथे नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे सहआयुक्त रविंद्र शिसवे,
अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, झोन 4 चे उपायुक्त रोहीदास पवार, येरवडा विभागाचे उपायुक्त किशोर जाधव, शिरूर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार, शिक्रापूर पोलीस हेमंत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक अशोक केदार, पोलीस कॉन्स्टेबल पवार, कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, पोलीस पाटील मलान गव्हाणे, मंडल अध्उइकरी विकास फुके उपस्थित होते.