नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती अखेरच्या वेळी शाहरुख खानसोबत “झिरो’मध्ये झळकली होती. यानंतर ती “पठाण’ चित्रपटातून कमबॅक करत आहे.
पण अनुष्काचा अभिनय पाहण्यासाठी मात्र तिच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. अनुष्का शर्मा लवकरच महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता तिने हा चित्रपट नाकारल्याचे समजते.
या चित्रपटात आता अनुष्का शर्मा ऐवजी अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिका साकारणार आहे. तर अनुष्का आता फक्त या चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमचा भाग असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2022च्या सुरुवातीला सुरू होणार आहे.
हा चित्रपट सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय तृप्तीला या चित्रपटासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्याच कारणाने अनुष्काने या चित्रपटाला नकार दिल्याचे बोलले जात आहे.