दिल्लीत जंगलराज : वैमनस्यातून गर्भवतीचा विनयभंग करत तोडले दोन्ही हात

नवी दिल्ली – ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात किरकोळ भांडणात शेजाऱ्यांनी गर्भवती महिलेचे दोन्ही हात तोडले शिवाय तिचा शारीरिक छळही केला. महिलेच्या पतीलाही बेदम मारहाण करण्यात आली. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पीडितेला गंभीर अवस्थेत जग प्रवेशचंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत महिलेचे दोन्ही हात तुटले आहेत. पीडिते महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घरात घुसून मारहाण, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शालू (नाव बदलले आहे) ही शास्त्री पार्क परिसरात भाड्याच्या घरात कुटुंबासोबत राहते. तिच्या कुटुंबात पती आणि मुले आहेत. शालू सहा महिन्यांची गरोदर आहे. शालूने पोलिसांना सांगितले की, पाच-सहा महिन्यांपूर्वी त्याच्या कुटुंबाचे शेजारी राहणाऱ्या आसिफच्या कुटुंबाशी भांडण झाले होते. या भांडणात शालूच्या पतीचे डोके फोडण्यात आले होते. त्याच्या डोक्याला 14 टाके पडले होते.

मात्र दोन्ही कुटुंबांमध्ये समझोता झाल्याने एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. शालूने सांगितले की, तेव्हापासून आसिफ आणि त्याच्या कुटुंबाचे वैर आहे. रविवारी आसिफच्या कुटुंबातील एका मुलाने त्यांच्या भांड्यात जाणूनबुजून थुंकल्याचा आरोप आहे. यावरून वाद झाल्यानंतर आसिफच्या कुटुंबातील लोकांनी हल्ला केला.

या हल्ल्यादरम्यान आरोपीने शालूच्या पोटावर काठीने मारण्यास सुरुवात केली असता पीडितेने दोन्ही हातांनी तिटे पोट धरले. त्यानंतरही आरोपींनी पीडितेस काठीने मारहाण सुरूच ठेवली. यामध्ये शालूचे दोन्ही हात तोडले गेले. यानंतर आरोपींनी महिलेच्या पतीलाही बेदम मारहाण केली. घटनेनंतर आरोपी पळून गेले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.