मुंबई- आपटी बार तरी बरा असतो, साडे तीन नावे नव्हे एकही नाही सांगितले. आता तुमच्या लग्नापर्यंत पोहोचले म्हणून तुम्ही मुनगंटीवारांच्या मुलीच्या लग्नापर्यंत पोहोचला, असे म्हणत भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनीच राऊतांच्या बोलण्यातल्या त्या भाजप नेत्याचे नाव सांगून टाकले आहे.
राऊतांनी एका माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाचा उल्लेख केला होता. मात्र त्यात त्यांनी कोणते नाव घेतले नव्हते. मात्र राऊतांवर टिका करताना दरेकरांनीच ते नाव उघड करून टाकले. तसेच पुढे बोलताना, मला असे वाटते की मोठा इन्व्हेंट करुन काहीतरी चित्र निर्माण करायचे, पण राऊत तोंडावर आपटले.
ते ओपनली सांगत आहेत की मला जेलमध्ये टाका. उलट सोमय्यांनीच पीएमसी घोटाळा बाहेर काढला. पण सरकार तुमचे आहे, चौकशी करा, अटक करा, असे म्हणत राऊतांना प्रतिआव्हान दिले. तसेच सत्तेतला पक्ष मोर्चा काढतो हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.