FIH Men’s Hockey Pro League 2023/24 : भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयएच FIH प्रो लीग 2023-24 च्या युरोप टप्प्यातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध 1-4 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना शुक्रवारी बेल्जियममधील अँटवर्प येथे खेळला गेला.
भारतातर्फे अभिषेक (55वे मिनिट) याने एकमेव गोल केला, तर बेल्जियमसाठी फेलिक्स डेनेयर (22वे मिनिट), अलेक्झांडर हेंड्रिक्स (34वे व 60वे मिनिट) आणि सेड्रिक चार्लियर (49वे मिनिट) यांनी गोल केले.
A tough fight till the end, it just wasn’t our night. 💔
We take the fight to the next game on Saturday against the same team.At Full-Time:
Belgium 🇧🇪 4️⃣ : 1️⃣ India 🇮🇳Goalscorers:
22′ Denayer Felix
34′ Hendrickx Alexander (PC)
49′ Charlier Cédric
60′ Hendrickx Alexander… pic.twitter.com/vEKKdi2qHC— Hockey India (@TheHockeyIndia) May 23, 2024
या पराभवानंतर, भारत एफआयएच (FIH) प्रो लीग 2023-24 मध्ये 10 सामन्यांतून 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बेल्जियमही 10 सामन्यांतून सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आता भारतीय पुरुष हॉकी संघ पुन्हा एकदा 25 मे रोजी बेल्जियमशी भिडणार आहे.