पैसा गेला अन् रक्ताच नातंही आटलं..! मुलीने पुन्हा एकदा राणू मंडला सोडले वाऱ्यावर

मुंबई – पश्चिम बंगालमधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ गेल्या वर्षी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले.

रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती. मात्र सध्या त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून  उद्धटपणामुळे  ट्रोलिंग सुरु झाली होती.

यातच आता रानू पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे. नुकतीच रानू मंडलचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती कारच्या समोरा माइक पकडून लता मंगेशकर यांचे गाणे गाताना दिसत आहे. पुन्हा एकदा ती जुन्या वेशात दिसते आहे. यातच  आता  राणूची आर्थिक स्थिती पुन्हा ढासळू लागली तेव्हापासून मुलीनेही राणूची साथ सोडल्याचे समोर आले आहे. पहिले मुलीने तिला जवळ केले होते मात्र आर्थिक परिस्थिती हलवताच तिने राणूला दूर केले आहे.  

दरम्यान, गेल्या वेळीही एका चाहतीला फटकारतानाचा रानू व्हिडीओ व्हायरल झाला होता. रानू मंडल दिसताच एक चाहती रानू जवळ येते आणि हात लावून बोलण्याचा प्रयत्न करते, असे या व्हिडीओत दिसले होते. पण चाहतीचे अशा प्रकारे हात लावणे रानूला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती रागात ‘डोन्ट टच मी, आय एम सेलिब्रेटी नाऊ’ असे म्हणते. या व्हिडीओनंतरही रानू ट्रोल झाली होती. स्टारडम मिळाल्यामुळे रानू मंडलच्या डोक्यात हवा गेल्याची प्रतिक्रिया अनेकांनी त्यावेळी दिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.