“…तर आम्ही पाकिस्तानला बघून घेऊ”; अफगाणिस्तानातील हस्तक्षेपावर अमेरिकेचा पाकला सूचक इशारा

न्यूयॉर्क : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पाकिस्तानने आपली भूमिकाच बदलून टाकली आहे.त्यातच पाकिस्तानने तालिबान्यांना केलेली मदत आणि अफगाणिस्तानातील लुडबुड ही आता त्यांना चांगलीच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. कारण पाकच्या या भूमिकेमुळे अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर विचार करू असे म्हटले आहे. केवळ आपल्याच नाही तर भारताकडून अफगाणिस्तानसंदर्भात केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारी पाकिस्तानची भूमिका असेल तर ‘बघून घेऊ’ अशी भूमिका अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटींनी व्यक्त केली आहे.

मागील काही काळापासून पाकिस्तानचा अफगाणिस्तानबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे. मधील हस्तक्षेप वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट पाकिस्तानचा उल्लेख करत ‘जशास तसे उत्तर मिळेल’ असा सूचक इशारा पाकिस्तानला आणि पर्यायाने सत्ताधारी इम्रान खान सरकारला  दिला आहे. त्यामुळे इथून पुढचा काळ हा पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरणार असल्याचे दिसत आहे.

मागील २० वर्षांमध्ये तसेच त्यापूर्वीही पाकिस्तानने अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनुसार त्यांनी अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल सातत्याने दावे केल्याचे दिसून आले. त्यांनी तालिबान्यांना आश्रय दिला ज्यामध्ये हक्कांनी समुहातील तालिबान्यांचाही समावेश होता, असे अमेरिकन स्टेट सेक्रेट्री अँथनी ब्लिंकेन म्हणाले आहेत.

पाकिस्तानने अशी भूमिका घेण्यामागे त्यांचे काही विशिष्ट हेतू असतील आणि त्यापैकी काही अफगाणिस्तानसंदर्भातील आमच्या तसेच भारत अफगाणिस्तानमध्ये बजावत असणामऱ्या भूमिकेविरोधात जाणारे असतील तर आम्ही त्याकडे नक्कीच कटाक्षाने लक्ष देणार आहोत असेही अमेरिकने थेट शब्दात सांगितले आहे.

इतक्यावरच न थांबता अमेरिकेने थेट पाकिस्तानला अफगाणिस्तानसंदर्भातील भूमिकेची किंमत चुकवावी लागणार असल्याचे संकेत दिलेत. “पुढील काही आठवड्यांमध्ये अमेरिका पाकिस्तानसोबत असणाऱ्या संबंधांबद्दल विचार विनिमय करणार आहे,” असे  ब्लिंकेन म्हणाल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटले आहे.  अफगाणिस्तानच्या भविष्यासंदर्भात वॉशिंग्टन काय भूमिका घेणार आहे हे येत्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल असे ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.