मुंबई – अभिनेत्री ‘प्रार्थना बेहेरे’ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रार्थनाने रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असण्यासोबतच प्रार्थना अनेक सोशल कार्यक्रमांना देखील हजेरी लावते. नुकतंच तिने अभिनेता जॅकी श्रॉफ सोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
चित्रपटांसोबतच प्रार्थना टीव्ही सिरियल्समध्ये देखील झळकलेले आहे. म्हणूनच तिचे फॅनफॉलोईंग प्रचंड आहे. नुकतंच एका कर्यक्रमाबाबत तिने आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लेसीमिया या आजाराबाबत सांगितले आहे.
प्रार्थना आपल्या पोस्टमध्ये म्हणते,”लेसीमिया – हा एक असा आजार आहे जो मुलानंमध्ये जन्मापासूनच असतो आणि जन्मल्याच्या 3 महिन्यानंतर त्याचे लक्षण दिसून येतात. तज्ज्ञ सांगतात की या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणे करून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं.दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. आणि आज ही संधी माल मिळाली”
या पोस्टमध्ये प्रार्थनाने पुढे अभिनेता जॅकी श्रॉफचे आभार मानत त्याला टॅग देखील केले आहे. यासोबतच तिने कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांनी तिच्या या कार्याबद्दल तिचे कौतुक केले आहे. प्रार्थनाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनया बरोबरच प्रार्थना सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देते. मात्र यावेळी तिने शेअर केलेली ही सोशल कॉजवाली पोस्ट चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.