मुंबई – अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिकेसह तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’, मितवा’ या सारख्या तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अभिनयानंतर प्रार्थनाने नवीन इनिंग सुरू केली आहे. प्रार्थनाने आता एक उद्योजिका म्हणून सुरुवात केली आहे. सोशल मीडियाद्वारे तिने चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
प्रार्थनाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. ‘वी नारी’ असे या ब्रँडचे नाव आहे. इंस्टा लाईव्ह येत अभिनेत्रीने चाहत्यांना या ब्रँडची माहिती दिली आहे. प्रार्थनाने लिहिलं आहे, “स्वत:चा ब्रँड सुरू करण्याची माझी खूप इच्छा होती. गेल्या काही दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होते. आता मी आणि माझ्या नणंदेने मिळून एक ब्रँड सुरू केला आहे”.
View this post on Instagram
“नवरात्रोत्सवनिमित्त नऊ दिवसांसाठी नऊ रंगाच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मी माझ्या नव्या व्यवसायाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच सोबत राहु द्या”, असे प्रार्थना म्हंटले आहे. प्रार्थनाने या नव्या व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर त्यांच्या पहिल्या साडीची झलक देखील इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
दरम्यान, प्रार्थना बेहेरेच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत प्रार्थनासह अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होता. याशिवाय प्रार्थना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.