Entertainment : अभिनेत्री प्रार्थना बेहरेने ( Prarthana Behere ) अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळाला होता. अश्या प्रार्थना सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिच्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत पोस्टद्वारे शेअर करत असते. अशात प[प्रार्थनाच एक सोशल मीडिया ब्लॉग चांगलाच चर्चेत आला आहे.
प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे की आता ती मुंबई बाहेर निसर्गाच्या सानिध्यात कायमची राहायला गेली आहे. तिने काही दिवसांपूर्वीच यूट्यूब चॅनल सुरू केल. या चॅनलवर नुकताच तिने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये तिने ती अलिबागला कायमची शिफ्ट झाल्याचं सांगत तिने त्यांच्या आलिशान घरातील बागेची झलक दाखवली आहे.
पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने घराबाबत माहिती देत निसर्गावर तिचे किती प्रेम आहे हे सुद्धा अधोरेखित केले आहे. व्हिडिओमध्ये ती सांगते,’हे घर मी आणि माझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने आणि मनापासून बनवलं आहे.
त्यामुळे या घरासाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला थोडा त्रास झाला. मला वाटायचं की मुंबईत आपलं सगळं काम आहे आणि ते सगळं सोडून अलिबागला कायमचं कसं शिफ्ट व्हायचं? मी हे सगळं कसं सांभाळू शकेन असा मला प्रश्न पडला होता. पण खरं तर हे सगळं सांभाळणं खूप सोपं आहे हे मला नंतर कळलं.” असंही तिने सांगितले आहे.
दरम्यान, प्रार्थना बेहेरेच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत प्रार्थनासह अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होता. याशिवाय प्रार्थना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.