मुंबई – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप लगावले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, भाषण संपवून लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी महिला खासदारांकडे फ्लाइंग किसचे हावभाव केले. भाजपच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे.
राहुल गांधी यांच्या कथित असभ्यतेबद्दलही स्मृती इराणी यांनी सभागृहात तक्रार करताना म्हटले की, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्याला माझ्यासमोर बोलण्याची संधी दिली गेली, त्यांनी (राहुल गांधी) जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केले.
हा प्रकार देशाच्या सभागृहात कधीही द्वेषपूर्ण वागणूक दिसली नाही. देश कोणत्या घराण्याची लक्षणे पाहत आहे.’ या प्रकरणावर अनेकांनी आपल्या प्रतिकिया दिल्या आहेत.
Priorities… Madam ji is offended by a flying Kiss .. but not by what happened to our #manipurwomen #ManipurVoilence #justasking https://t.co/hWcCLTZ8id
— Prakash Raj (@prakashraaj) August 9, 2023
मात्र, अश्यातच आता या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही या भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रकाश राज यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“मणिपूरमध्ये जे झालं त्यामुळे नाही तर फ्लाइंग किसमुळे मॅडमजी नाराज आहेत..’ असं प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सध्या प्रकाश राज यांच्या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.